चौधरी परिवारावर शोककळा ; श्रीमती लक्ष्मीबाई प्रभूआप्पा चौधरी यांचे निधन ; उध्या दि ९ जानेवारी मंगळवार रोजी अंत्यविधी
परळी (प्रतिनिधी ) येथील श्रीमती लक्ष्मीबाई प्रभूआप्पा चौधरी यांचे सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर मंगळवारी सकाळी ९ वाजता वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा गणेशपार रोड ,जुन्या नगर बँके समोर येथून निघणार आहे. कै. लक्ष्मीबाई या धार्मिक वृत्तीच्या असल्याने त्या सर्वपरिचित होत्या.त्यांच्या पश्चात साधना प्रिंटर्स चे संचालक गजानन व भुसार व्यापारी दयानंद, योगानंद चौधरी हे तीन मुले, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. चौधरी कुटुंबीयावर कोसळलेल्या दुःखात दै…………. परिवार सहभागी आहे.