23.3 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

उद्या महिला महाविद्यालयात रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन

उद्या महिला महाविद्यालयात रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन

स्व. श्यामरावजी देशमुख स्मृतिनिमित्त भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

परळी, दि. ८/०१/२०२४(प्रतिनिधी)
येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ याहीवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.संस्थेचे अध्यक्ष मा.संजयजी देशमुख , सचिव रवींद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसादजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात व्याख्यानाबरोबरच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरिता रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक शाळेने व महाविद्यालयाने आपापल्या स्तरावर निबंध स्पर्धा घेऊन त्यातील पहिल्या तीन मुलींचे निबंध दि.१० /०१/२०२४ पर्यंत संयोजन समितीकडे आणून द्यावेत.त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा ही उद्या दि.१० /०१/२०२४ रोजी सकाळी १०:०० वा. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रत्यक्ष संपन्न होईल.रांगोळी व निबंध स्पर्धेत प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम ,प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन स्मृतीसमारोहामध्ये दि. २४ जानेवारीला व्याख्यान कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.स्व. श्यामरावजी देशमुख स्मृतिसमारोहानिमित्त दि. २४ / ०१ / २०२४ रोजी मा. अभय भंडारी (विटा,सांगली) यांचे ‘ रामायण ,महाभारत आणि आजचे जीवन ‘या विषयावर व्याख्यान होईल तर दिनांक . २५/ ०१ / २०२४ रोजी प्रा डॉ. विश्वाधार देशमुख यांचे ‘भूता परस्परे पडो , मैत्र जिवाचें ‘ या विषयावर व्याख्यान होईल आणि दिनांक . २६ / ०१ / २०२४ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन मा. धनंजय गुडसूरकर यांच्या शुभहस्ते संपन्न होईल त्याचबरोबर यावेळी त्यांचेही व्याख्यान होईल.
रांगोळी स्पर्धेसाठी प्रा.डॉ.आर.आर. पाध्ये व प्रा. के. बी.देशपांडे मॅडम यांच्याशी तर निबंध स्पर्धेसाठी प्रा.डॉ.श्याम नेरकर यांच्याशी संपर्क साधावा व बहुतांश स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या , डॉ. विद्या देशपांडे यांच्यासह सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड व संयोजन समितीतील प्रा.डॉ. राजश्री. कल्याणकर ,डॉ. अरुण चव्हाण ,प्रा. विशाल पौळ ,प्रा. देशपांडे के. बी . , प्रा. वीणा भांगे व इतर सहकारी प्राध्यापकांनी केलेले आहे .

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या