20.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

पोलीस संरक्षण देण्यात यावं पोलिस अधिक्षकांकडे – बाबुराव तिडके यांची निवेदनाद्वारे मागणी

पोलीस संरक्षण देण्यात यावं पोलिस अधिक्षकांकडे – बाबुराव तिडके यांची निवेदनाद्वारे मागणी

भोगलवाडी येथे कापसासह घरावर कब्जा करून चोरून कापुस विक्री केला गुन्हा दाखल करून घर ताब्यात देण्यासाठी पोलीस संरक्षण देण्यात यावं पोलिस अधिक्षकांकडे – बाबुराव तिडके यांची निवेदनाद्वारे मागणी

बीड ( प्रतिनिधी )

भोगलवाडी येथे श्री बाबुराव भिमराव तिडके यांचे राहाते घर क्र 651 आहे सदरिल सावकार श्रीकृष्ण सोपान तिडके याने त्याच्या कडे कोणताही पुरावा नसताना माझ्या स्वःताच्या घरावर कापसासह कब्जा केलेला असुन त्यातील 15 क्विंटल कापुस त्याने चोरून विक्री केलेला आहे तरि चोरीचा गुन्हा दाखल करून घर ताब्यात देण्यासाठी बीड जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी तक्रारदार यांणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे
दि 13 – 1 – 2O24 वार शनिवार रात्री 2 : OO वाजता नामे श्रीकृष्ण सोपान तिडके . परमेश्वर सोपान तिडके . अंजनाबाई सोपान तिडके . स्वाती श्रीकृष्ण तिडके यांनी 15 क्वींटल कापसाची चोरी करून वाहन कृमांक MH – 45 -9682 या वाहना भरून परस्पर विक्री केला त्याचे माझ्याकडे जे पैसे होते ते मी पूर्ण गावातील प्रतिष्ठीत असणारे श्री महादेव अर्जुन तिडके .लालासाहेब उत्तम तिडके .ज्ञानोबा ग्यानबा तिडके . मधुकर बाळकिसन तिडके . रामहारी सोपान तिडके यांच्या हाताने परत दिले परत खंडणी स्वरूपात एक लाख रुपये आपणास त्याचा भाउ व तो मागतो परत माझ्याच विरोधात धारूर पोलिस स्टेशनला माझ्या बायकोची छेडछाड केली म्हणुन मुद्दाम मला त्रास देण्यासाठी अर्ज दिलेला आहे गावात येऊन पोलिसांनी खरी चौकशी करावी त्याचा भाऊ माझ्या लहान मुलासह मला धमकावत असुन मी नौकरीला असल्यामुळे तिकडुन गावठी पिस्तुल आणला आहे गोळी घालीन घराकडे आला तर कुत्र्यासारखे मारून हातपाय तोडीन म्हणुन धमकावत आहे जर माझे काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार वरिल चार आरोपी राहातील त्याने चोरून आणलेला गावठी पिस्तुल जप्त करावा व पोलिस अधिक्षक साहेब यांनी चोरूचा गुन्हा दाखल करून माझे घर माझ्या ताब्यात देण्यासाठी पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे श्री बाबुराव भिमराव तिडके यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे .

 

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या