मकर संक्रांती निमित्त परळीच्या श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
परळी वैजनाथ/प्रतिनिधी
परळी वैजनाथ येथील श्री अय्यप्पा स्वामी मंदिर येथे आज सोमवार दिनांक 15 जानेवारी रोजी मकर संक्रांति निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री अयप्पा स्वामी यांचा अभिषेक, कलश पूजन व महाआरती करण्यात आली. तसेच सकाळी 5 वाजता श्री अय्यप्पा स्वामी ट्रस्टच्या वतीने प्रभु वैद्यनाथ देवताला अभिषेक करण्यात आला.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पंचम ज्योतिर्लिंग श्री प्रभू वैजनाथ मंदिर जवळील श्री अय्यप्पा स्वामी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 5 वाजता श्री अयप्पा स्वामी ट्रस्टच्या वतीने प्रभु वैद्यनाथास अभिषेक करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री आयप्पा स्वामींची पूजा व अभिषेक करण्यात आला. विविध रंगीबेरंगी फुलांनी मंदिर परिसर फुलून गेला होता. दुपारी श्री अयप्पा स्वामी यांची पालखी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गेली होती. कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.