10.4 C
New York
Monday, March 17, 2025

Buy now

पंतप्रधान नरेंद्र मोदी घटना बदलणार ही…. काँग्रेसची अफवा ; घटना कोणीच बदलू शकणार नाही

*पंतप्रधान नरेंद्र मोदी घटना बदलणार ही…. काँग्रेसची अफवा ; घटना कोणीच बदलू शकणार नाही ….*
*केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रतिपादन*

वाशीम दि.15:(अजय ढवळे ) सध्या सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय राज्य घटना म्हणजेच देशाचे संविधान बदलणार म्हणून काँग्रेस व विरोधी पक्ष अपप्रचार करीत आहे. ही निव्वळ अफवा आहे. कारण संविधान बदलणे कुणाला ही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे जनतेने काँग्रेस च्या अफवाला बळी पडू नये, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले.
आज वाशीम येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने भूमी हक्क परिषद आयोजित करण्यात आली असता प्रसार मध्यमाशी बोलत होते.
यावेळी रिपाई चे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, सुमित वझाले, झोपदपटी महासंघ अध्यक्ष, नरहरी गवई, बुलढाणा जिल्हाध्यक्ष महेंद्र ताजने,व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले की, राज्यात मराठा आरक्षण मागणी जोर धरित आहे. आमची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे, परंतु ओबीसी व मराठा समाजात सलोखा राहावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण दिले पाहिजे. असेही ते म्हणाले.
….

ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा फार्मुला महाविकास आघाडीने स्वीकारावा..

ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महा विकास आघाडीकडे दिलेला १२/१२ चा फार्मुला मान्य करावा. म्हणजे त्यांचे १२ वाजवायला वेळ लागणार नाही. आगामी लोकसभेत अकोल्यात बाळासाहेबांनी आम्हाला मदत करावी व त्याबदल्यात आम्ही त्यांना मदत करू असेही मिश्किल शब्दात त्यांनी भाष्य केले.

लोकसभेच्या २ जागेची मागणी
आगामी लोकसभा महायुती ताकतीने लढणार आहे. मात्र त्यांना रिपाई ची साथ गरजेची आहे. राज्यातील शिर्डी व विदर्भातील एक अश्या दोन जागा मागणार आहोत. त्यामुळे त्यांनी आमच्या कार्यकर्त्याचा सन्मान करावा. कार्यकर्ते नाराज होणार नाहीत याची खबरदारी भाजप व महायुतीने घ्यावी.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या