चेतन वर्मा जिल्हा प्रतिनिधी :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड.
( मुब्रा कळवा विधानसभा ) यांनी दिनांक. 3/1/2024 रोजी शिर्डी येथे सभेतील भाषणामध्ये हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या.
प्रभू श्री रामचंद्र यांच्या बाबत ‘राम हा मांसाहारी होता’ असे अतिशय निंदनीय वक्तव्य केले होते. त्या निषेदार्थ मंगळवार दिनांक. 16/1/2024 रोजी राळेगाव शहर विश्वहिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम सेना च्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड याच्या विरोधात राळेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ,श्रीराम सेना चे शहर संयोजक जगदीश निकोडे, रामभाऊ पायघन, सागरजी वर्मा, सुरज भाऊ गुजरकर,युवराज देवकर, गणेश शेंडे, हर्षल येडे, सुरज खुरपडे प्रशांत शेंदरे, अक्षय कोल्हे, प्रतिक कोल्हे, गौरव ठाकरे, सुरज नगराळे, तसेच राळेगाव शहरातील सर्व राम भक्त उपस्थित होते.