21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

मराठवाड्यातील व हैदराबाद येथील निजाम कालीन दस्तऐवज तपासून कुणबी नोंदी शोधा.

मोडी लिपी वाचक वैभव देवराम जगताप यांना विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती देऊन मराठवाड्यातील व हैदराबाद येथील निजाम कालीन दस्तऐवज तपासून कुणबी नोंदी शोधा.

मोडी लिपी वाचक वैभव देवराम जगताप यांना मराठवाड्यामध्ये शासनाचा विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती देऊन मराठवाड्यातील व हैदराबाद येथील निजाम कालीन दस्तऐवज तपासून कुणबी नोंदी शोधा.
ॲड माधव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली मागणी….

बीड : प्रतिनिधी

 

मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम शासन स्तरावर चालू आहे.परंतु मराठवाड्यातील जनतेची जनगणना निजाम सरकारने सन १८८० साली केली होती व त्यावर्षी सदरची जनगणना करताना संपूर्ण नोंदी ह्या मोडी लिपी मध्ये व उर्दू लिपी मध्ये निजाम सरकारने केलेल्या होत्या.सध्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मोडी लिपीच्या नोंदी उपलब्ध आहेत.परंतु मोडीवाचक उपलब्ध नसल्याने महसूल व भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना मोडी भाषा कळत नसल्यामुळे त्यांनी कुणबी नोंदी नाहीत अशा प्रकारचे अहवाल शासनाकडे पाठवले होते. परंतु त्यानंतर शासनाने कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवला.त्यामध्ये अनेक भागामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदणी आढळून आलेल्या आहेत.मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये व अनेक तालुक्यांमध्ये कुणबी नोंदी सापडत नाहीत किंवा मिळून आल्या नाहीत अशा प्रकारचे अहवाल शासन दरबारी दिल्यानंतर सुद्धा मराठवाड्यामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये वैभव देवराम जगताप या मोडी लिपी वाचक यांनी बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये हजारोंच्या संख्येने मोडी लिपीत कुणबी नोंदी असल्याचे आढळून आले आहे व त्यामुळे मराठा समाजाला योग्य तो न्याय मिळत आहे.परंतु वैभव देवराम जगताप यांना शासनाने मराठवाड्यामध्ये विशेष दर्जा देऊन त्यांची मोडी लिपी वाचक म्हणून त्यांची नियुक्ती करावी व त्यांना संपूर्ण अभिलेख तपासण्याचे अधिकार शासनाने द्यावेत व त्याचप्रमाणे मराठवाड्यातील जनगणना निजामकालीन सरकारने केलेली होती व त्या मोडी लिपीतील नोंदी या हैदराबाद येथे उपलब्ध आहेत.हैदराबाद येथे जाऊन मोडी लिपीच्या नोंदी या मराठा कुणबी नोंदी आहेत किंवा नाहीत याची तपासणी करण्याचे संपूर्ण अधिकार महाराष्ट्र सरकारने वैभव देवराम जगताप व त्यांच्यासोबत आणखीन काही इतर मोडी लिपी वाचक यांना देऊन ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून यांना हैदराबाद येथे पाठवावे व मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधून काढण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत व त्याचप्रमाणे मोडी लिपी वाचक वैभव देवराम जगताप यांना शासनाने विशेष दर्जा देऊन त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही विनंती ॲड.माधव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान योजना ईमेलद्वारे केले आहे सदर ई-मेल हा मुख्यमंत्री कार्यालयाने महसूल विभाग कडे पाठविला आहे..

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या