24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img

भगवान विद्यालयात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात रंगली उखाण्यांची स्पर्धा

भगवान विद्यालयात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात रंगली उखाण्यांची स्पर्धा

परळी (प्रतिनिधी) भगवान प्राथमिक विद्यालयात सांस्कृतिक विभागाकडून मकर संक्रांति निमित्त शाळेतील महिला पालक वर्ग आणि गल्लीतील सुवासिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला गेला.
याच कार्यक्रमात उपस्थित सौभाग्यवतींमध्ये उखाण्यांची अनोखी स्पर्धा खूपच रंगली यावेळी गल्लीतील महिला आणि शाळेतील सर्व महिला पालकांची गर्दी पाहायला मिळाली.
उपस्थित सुहासिनी मधून ठरलेल्या वेळेत जी महिला जास्तीत जास्त उखाणे घेईल ती विजेता ठरेल अशी अनोखी स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम क्रमांक सौ. गवळण गिन्यानदेव कांदे, द्वितीय क्रमांक सौ. ज्योती संतोष हलकंचे आणि तृतीय क्रमांक सौ. पूजा एकनाथ दीक्षित
या सुवासिनी विजेत्या ठरल्या.
या अनोख्या स्पर्धेच्या तिन्ही विजेत्यांना संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्रीताई व्यंकटराव कराड यांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित महिला पालकांनी शाळेच्या या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले.
सर्वत्र इंग्रजी शाळांची फॅशन रूढ होत असताना भगवान विद्यालयातील अध्यापन पद्धती व सुसंस्कारी विद्यार्थी घडवण्याची परंपरा या विश्वासावर आजवर शाळेची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे, हीच विश्वासार्हता या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकांच्या मनोगता मधून दिसून आली.
श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या अध्यक्ष भाग्यश्रीताई कराड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षिका संघमित्रा वाघमारे ,सिंधू सोनवणे, अंजली कुलकर्णी यांनी या अनोख्या कार्यक्रमाचे सुंदर आणि नेटके नियोजन केले होते.
या कामी शाळेचे मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे सर यांचे मोलाचे योगदान मिळाले. यावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

spot_img
spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या