5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

डॉ.इंद्र मणी कुलगुरू यांच्या हस्ते रासी सीड्स कंपनी च्या RCH 929 वाण लावणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार

डॉ.इंद्र मणी कुलगुरू यांच्या हस्ते रासी सीड्स कंपनी च्या RCH 929 वाण लावणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार

डॉ.इंद्र मणी कुलगुरू यांच्या हस्ते रासी सीड्स कंपनी च्या RCH 929 वाण लावणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार

अंबाजोगाई :
दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई व केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विशेष कापूस प्रकल्प’ अंतर्गत ‘शेतकरी मेळावा’ कार्यक्रमाचे आयोजन केंद्राच्या प्रक्षेत्रावर करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मनि यांच्या हस्ते रासी सीड्स सघन पद्धतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकरी रामकिसन कवडे,रेवली रामभाऊ रुपणार,केकतसारणी यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी *रासी सीड्स कंपनीचे विभागीय अधीकारी रमेश शिरसाठ, ज्ञानेश्वर महाजन, बीड जिल्हा प्रतिनिधी बळीराम वीर, रतन बडे* यांची उपस्थिती होती.

मेळाव्याचे प्रास्ताविक करताना डॉ. देशमुख यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यातील जमिनीत कापूस महत्त्वाचे पीक आहे. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ५ तालुके व २८ गावांमध्ये अति-सघन लागवड पद्धत तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. या मध्ये *रासी सीड्स चे RCH 929* या वाणाची सघन लागवड करावी कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येत आहे. अतिसघन लागवड पद्धती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सघन पद्धतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे. या उद्देशाने मेळावा आयोजित केला होता .

 

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या