24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर येथील तीन तर मराठवाड्यातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्हा व उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून करण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील १३ तर मराठवाड्यातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे.

 

छत्रपती संभाजीनगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांची परभणी येथे तर उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांची हिंगोली आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त डॉ. भारत कदम यांची लातूर येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदल्या केल्या आहेत.

 

याशिवाय धाराशिव येथील महेंद्रकुमार कांबळे यांची बीडला जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली केली आहे. धाराशिवचे राजकुमार माने यांची नांदेडला, नांदेडचे संदीप कुलकर्णी धाराशिवला उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदल्या केल्या आहेत.

 

विभागीय आयुक्तालयातील मागासवर्ग कक्षाचे सहायक आयुक्त डॉ. भारत कदम यांची अवघ्या सहा महिन्यात बदली करण्यात आली आहे. डॉ. कदम यांची मे २०२३ मध्ये लातूर येथे सारथीमध्ये बदली केली होती. त्यानंतर त्यांची बदली रद्द करत जुलै २०२३ मध्ये मागास वर्ग कक्षाचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. सहायक आयुक्त म्हणून रुजू होऊन केवळ सहा महिन्यातच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली.

spot_img
spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या