नाथ शिक्षण संस्था कार्यालय येथे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचा सत्कार
परळी वैजनाथ (अमोल सुर्यवंशी ) :- रा.काँ.चे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचा नाथ शिक्षण संस्था कार्यालय येथे सहसचिव प्रदिप खाडे यांच्या हस्ते पुष्पगुछ, फेटाबांधून सत्कार करण्यात आला.
नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृषीमंत्री तथा पालकमंत्री, परळी विधानसभा मतदारसंघाचे आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वतीने रा. काँ. चे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे निवडीबद्दल सोमवार दि.०५ फेब्रुवारी रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयात शाल, श्रीफळ,फेटा बांधून, पुष्पगुछ देऊन यथोचित सत्कार पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे, पापा मुंडे, प्रा. शंकर कापसे, अशोक मुंडे उपस्थित होते.