कौडगाव हुडा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रस्तारोको आंदोलन
*येथील बेमुदत धरणे आंदोलनाला झाले १५६ दिवस*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
मराठा यौद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाच्या समर्थनार्थ परळी तालुक्यातील कौडगाव हुडा फाटा येथे परिसरातील २५ गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सोनपेठ ते सिरसाळा रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये महिलांचा लक्षनीय सहभाग असल्याचे पहाव्यास मिळाले.
कौडगाव हुडा फाटा येथील बेमुदत धरणे आंदोलनास आज १५६ दिवस झाले आहेत. दिनांक १७ सप्टेंबर २०२३ पासून बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या या आंदोलनाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन तात्काळ मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलनकर्ते करत आहेत.
दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी मराठा योद्धा मा.मनोज जरांगे पाटील यांनी कौडगाव फाटा येथील आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांसह सकल मराठा समाजबंधवांना मार्गदर्शन केले होते.
मा.मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रोत्साहित झालेले येथील आंदोलनकर्ते आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.