उत्सव शिव जन्माचा स्वराज्य कार्याचा …..!
आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी वैजनाथ.
परळी वैजनाथ : अमोल सुर्यवंशी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी वैजनाथ आयोजित स्वराज्य सप्ताह हिंदवी स्वराज्य स्थापनेस 350 वर्ष या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी वैजनाथ आयोजित रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 17 फेब्रुवारी 2014 रोजी छत्रपती शिवरायांचे जीवन चरित्र या विषयावरती निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धांचे ही आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धांचे ठिकाण हे : नवगण महाविद्यालय परळी वैजनाथ येथे आहे . स्पर्धांचा : वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. या स्पर्धांचे पारितोषिक पुढीलप्रमाणे आहे: प्रथम पारितोषिक 3000 व आकर्षक बक्षीस, द्वितीय पारितोषिक 2000 रुपये व आकर्षक बक्षीस, त्याचबरोबर तृतीय पारितोषिक 1000 व आकर्षक बक्षीस असे ठेवण्यात आलेले आहे. या सर्व स्पर्धांचे आयोजन हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्हा परळी वैजनाथ च्या वतीने करण्यात आलेले आहे अशी माहिती राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा प्रा. शिल्पा मुंडे यांनी दिली आहे.