*राष्ट्रवादी काँग्रेस स्वराज्य सप्ताहाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सर्वसामान्या पर्यंत पोचवत आहे -ऍड दयानंद लोंढाळ*
*स्वराज्य सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न*
अंबाजोगाई (अशोक दळवी):- राष्ट्रवादी काँग्रेस स्वराज्य सप्ताहाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सर्व सामान्य माणसापर्यंत पोचवीत असल्याचे मत ऍड दयानंद लोंढाळ यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , तसेच कृषीमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य सप्ताहाचे आयोजना करण्यात आले होते. या सप्ताहात आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी ऍड लोंढाळ बोलत होते.या स्वराज्य सप्ताहानिमित्त अंबाजोगाई शहरात जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण तसेच राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याचबरोबर वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजयी व गुणवंत स्पर्धकांचे बक्षीस वितरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रमुख पाहुणे म्हणून ऍड दयानंद लोंढाळ, माजी नगरसेवक महादेव आदमाने,मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड, आनंद टाकळकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व त्यांना मानवंदना देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक मुंजे यांनी केले. याप्रसंगी उपस्थित राजकिशोर मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आजच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगिकरण्याची खरी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व येथील सर्व पदाधिकारी काम करीत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऍड दयानंद लोंढाळ यांनी तेथे उपस्थित विद्यार्थी व पालकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट उलगडून सांगितला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित स्वराज्य सप्ताहाच्या माध्यमातून देखील महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेला जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याकाळी कुठलाही जातीभेद न करता अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती. शेतकरी हा राजा असून त्यांचा नेहमी सन्मान केला. शिवाजी महाराज सांगताना लोंढाळ यांनी तानाजी मालुसरे, जिवा महाले, शिवा काशीद आदी मावळ्यांचे व त्यांच्या कार्याचे दाखले दिले. मावळ्यांनी देखील लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अशी भावना ठेवल्याने स्वराज्याची स्थापना करू शकल्याचे याप्रसंगी लोंढाळ यांनी नमूद केले. स्वराज्य सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील सर्व गुणवंतांचे याप्रसंगी अभिनंदन व कौतुक केले.
आयोजित रांगोळी स्पर्धेच्या विजयी स्पर्धकांमध्ये अनुक्रमे ५ वी ते ७वी गटातून कु साक्षी बाळासाहेब पतंगे तृतीय, कु ऋतुजा अविनाश बंडापल्ले,तर प्रथम क्रमांक कु तृष्णा संतोष कदम,त्याचबरोबर ८वी ते १०वी गटातून प्रथम कु गायत्री गणेश लोखंडे, चि काळे रितेश लक्ष्मण द्वितीय तर चि मुकडे संचित सुशीलकुमार या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर वेशभूषा स्पर्धेत १ली ते ४ ठी गटात कु शृंतल गणेश सोनार प्रथम, चि ऋतुराज राहुल पवार द्वितीय, तर कु अनया माणिक खरात हिने प्रथम क्रमांक मिळवला. ५वी ते ७ वी गटातून चि पर्व लक्ष्मीनारायण सोमाणी प्रथम, चि अनिकेत अनिल गरबडे द्वितीय, तर कु वेदश्री श्रीकांत जोशी या विद्यार्थिनीस प्रथम पारितोषिक मिळाले. ८वी ते १० वी गटातील वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक कु समीक्षा विलास लोखंडे, कु डाके दुर्गा प्रेमकुमार द्वितीय तसेच कु राजेश्वरी पप्पू चौगुले हिचा तृतीय क्रमांक निघाला.
स्वराज्य सप्ताहातील निबंध स्पर्धेतील ५ वी ते ७ वी गटातून प्रथम येण्याचा मान कु सृष्टी श्रीधर सोनवणे, द्वितीय कु दिव्या देवानंद जगताप आणि तृतीय कु क्रिशा कपील इंदानी हिने मिळवला. त्याचबरोबर इयत्ता ८वी ते १० वी गटातून निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु प्राजक्ता सचिन गुलभिले, कु तेजस्विनी श्रीकृष्ण शेळके द्वितीय तर चि ज्ञानेश तुळजीराम सोन्नर या विद्यार्थ्यांनी पटकावला. शेवटी वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ७ वीतुन प्रथम चि युवराज महेश जाधव, कु रुद्राणी पद्माकर जाधव द्वितीय तर कु ऋतुजा अविनाश बंडापल्ले हिने तृतीय क्रमांक संपादन केला.त्याचबरोबर ८ वी ते १० वी गटातून कु नंदिनी योगीराज पांडे प्रथम, कु इशिका अमोल कांबळे द्वितीय तर कु सई संतोष मोहिते हिने प्रथम पदासाठी यश संपादन केले. विजयी सर्व स्पर्धकांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण, राजकिशोर मोदी, महादेव आदमाणे, ऍड दयानंद लोंढाळ , चंद्रकांत गायकवाड , आनंद टाकळकर , श्रीमती अंजली जोशी, विनायक मुंजे, राजेश कांबळे आदिंनी अभिनंदन करून विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सन्मान सोहळ्यास सर्व स्पर्धक व त्यांचे पालक व शिक्षकवृन्द मोठया संख्येने उपस्थित होता.