20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

कुंभारगांव सरपंचपदी अँड.स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांची निवड

कुंभारगांव सरपंचपदी अँड.स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांची निवड

विजयकुमार गायकवाड : तालुका प्रतिनिधी इंदापूर

इंदापूर: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अँड.स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांची शुक्रवार दिनांक १६/०२/२०२४ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली, अँड.स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांची यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच उज्वला परदेशी गैरव्यवहार प्रकरणी अपात्र ठरवल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी शुक्रवारी कुंभारगांव येथे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी अँड.स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी कोकरे यांनी अँड.स्नेहल दत्तात्रय धुमाळ यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी तलाठी भारती भाऊसाहेब, कुंभारगांव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सतिश बोरावके निवडणूक घेण्यास सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन गोरे, स्वप्नील लोंढे, उपसरपंच स्वाती भोईटे, आनंद देवगिरे उपस्थित होते, विरोधी गटाचे सदस्य निवडी वेळी गैरहजर होते. यावेळी माजी उपसरपंच कुंडलिक धुमाळ,माजी सरपंच जयश्री धुमाळ, माजी उपसरपंच संपत गावडे, माजी ग्रा पं सदस्य, लक्ष्मी विविध सोसायटीचे चेअरमन काशिनाथ धुमाळ, व्हा.चेअरमन प्रमोद धुमाळ, माजी व्हा.चेअरमन ज्ञानदेव धुमाळ, माजी चेअरमन दत्तात्रय धुमाळ, उत्तम धुमाळ संचालक व उदय भोईटे, सचिन डोळे, नितीन गोरे, रमेश धुमाळ, शहाजी धुमाळ, नितीन बंडगर, संजय धुमाळ, संजय ढोले, अरविंद वाघमारे, अभिजीत लोंढे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंचपदी निवड जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी भव्य असा सत्कार करत सरपंच अँड. स्नेहल धुमाळ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच अँड.स्नेहल दत्तात्रय धुमाळ दिली आहे.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या