5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

केज पोलिसांची कारवाई गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस हस्तगत

केज पोलिसांची कारवाई गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस हस्तगत

केज : हनुमंत गव्हाणे

केज पोलीसांची कारवाई केज शहरात देशी बनावटीचा गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस जवळ बाळगुन दरोड्याच्या
तयारीत असलेल्या सराईत टोळीस ताब्यात घेऊन सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
दिनांक 20/02/2024 रोजी मा. सहायक पोलीस अधीक्षक केज श्री कमलेश मीना साहेब यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली आहे की, काही इसम हे हमरस्त्यावर लूटमार करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाई कडुन नेकनुर कड़े एका पांढन्या
रंगाची सुझूकी कंपनीची इर्तीगा चारचाकी गाडी क्रमांक MH-46-CM-1934 मध्ये बसून येत अशी बातमी मिळाल्याने त्यांनी
त्यांचे कार्यालियातील पोना विकास चोपने, पोना/अनिल मंदे, पोना/दिलीप गित्ते, पोकॉ/ अशपाक ईनामदार, पोह भुंबे तसेच
पोलीस स्टेशन केज येथील पोउपनि शिंदे साहेब, पोकॉ/शहादेव म्हेत्रे पोकों/ महादेव बहिरवाळ,पोरकों प्रकाश मुंडे यांना सोबत
घेवुन केज शहरामध्ये केज ते अंबाजोगाई रोडवर, तांबवेश्वर मेडीलक समोर रोडवर सापळा लावुन अंबाजोगाई कडुन
येणान्या पांढन्या रंगाची ईटीगा गाड़ी क्रमांक MH-46-CM-1934 हिस आडवून गाडीतील इसमांना ताब्यात घेवुन पोलीस
स्टेशन केज येथे आणुन सदर इसमांची व गाडीची झड़ती घेतली असता सदर इसमांच्या ताब्यात एक देशी बनावटीचा गावठी
कट्टा,पाच जिवंत काडतुस, एक रिकामी मॅग्झीन व गाडीमध्ये मध्यल्या शिटखाली एक लोखंडी रॉड, डिक्कीमध्ये एक लोखंडी
रॉड, एक लोखंडी स्क्रू ड्राव्हर व एक लाकडी दंडका मिळन आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत ताब्यात घेतलेल्या
इसमांची नावे 01) गणेश पांडुरंग भोसले,रा. यशर्वंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि. बीड, 02) हरीष तोमर
देवडीगा,रा. बजेगली ता., कारकला जि. उडपी राज्य कर्नाटक ह. मु. डोंबीवली, मुंबई जि. मुंबई, 03) नारायण मंगळा
करण,रा.महेशा ता. कृष्णप्रसाद जि. पुरी राज्य ओडीसा ह.मु. सायन मुंबई, 04) श्रीनिवास आशाअली बारगम,रा.संत ज्ञानेश्वर
नगर गर्हमेंट कॉलनीच्या बाजुला बांद्रा पूर्व मुंबई, 05) श्रावण शिवाजी गायकवाड,रा. बोरीवली मुंबई, 06) दिपक दशरथ चाटे
ऊर्फ ताठे,रा. धर्मेनाका कामगार नगर-2 मुंबई, 07) नामदेव परसु पोवार, रा.कामोठा नवी मुंबई ता. पनवेल जि. रायगड असे
असून सदर 07 आरोपी विरुध्द पोना/विकास चोपने यांचे फिय्यादी वरुन केज पोलीस स्टेशन येथे कलम 399 भादविसह कलम
3/25 भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा नोद करण्यात आला आहे, सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश पांड्रंग भोसले यासह
इतर आरोपीवर सुध्दा अंबाजोगाई, मुंबई, ठाणे शहरामध्ये दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल
आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री. नंदकुमार ठाकुर साहेब, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती,
चेतना तिडके मडम यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज श्री, कमलेश मीना साहेब, पोलीस
निरीक्षक श्री. प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक अनंद शिंदे, पोलीस कर्मंचारी विकास चोपने, अनिल मंदे, दिलीप गित्ते, अशपाक ईनामदार, भुंबे, शहादेव म्हेत्र, महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री. कमलेश
मीना साहेब व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या