डॉ राजेंद्र खाडे यांची सातारा जिल्हा नियोजन समितीवर निवड
सातारा : प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलावर सतत वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे सर्व सामान्य लोकांच्या अडचणी अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असणारे युवकांचे प्रेरणास्थान आशास्थान डॉ राजेंद्र खाडे यांची नुकतीच सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी शासनाकडून निवड घोषित करण्यात आलेली आहे.शिखर शिंगणापूर ते गोपिनाथ गड यात्रा दरवर्षी नियमित पणे आयोजित करून लोकनेते स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या बद्दल असणारी निष्ठा जपणारे डॉ राजेंद्र खाडे हे व्यवसायाने डॉक्टर असून नवी मुंबई परिसरात अल्पावधीतच वेगवेगळ्या भागात सात ते आठ दवाखान्यांचा आरंभ करून लोक सेवा करणारे डॉ साहेब वैद्यकीय व्यवसाया सोबतच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून राजकारणात देखील सक्रिय आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता पक्षाने त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्त केले . पळशी ग्रामपंचायत देखील डॉ राजेंद्र खाडे यांच्या ताब्यात असून संरपच पदी आई संरपच म्हणून कार्यरत आहेत.अनेक योजना खेचून आणण्याची ताकद क्षमता आसणार नेतृत्व म्हणून पश्चिम महाराष्ट्रात ओळख निर्माण झालेले डॉ राजेंद्र खाडे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी झालेली निवड देखील जन कल्याण होण्यासाठी कारणी लागेल असा सर्व सामान्य माणसाला विश्वास आहे.