5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

कृषिमंत्री धनंजय मुंडे व श्री श्री रविशंकर यांची भेट जलयुक्त शिवार 2.0 अवर्षण ग्रस्त भागातील भूजल पातळी वाढविण्यासाठी तयार करणार विशेष ऍक्शन प्लॅन

🔶कृषिमंत्री धनंजय मुंडे व श्री श्री रविशंकर यांची भेट
जलयुक्त शिवार 2.0 अवर्षण ग्रस्त भागातील भूजल पातळी वाढविण्यासाठी तयार करणार विशेष ऍक्शन प्लॅन

🔶जलयुक्त शिवार 2.0 राबविण्यासाठी राज्य शासन व आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये झाला होता करार

🔶अवर्षण ग्रस्त भागातील भूजल पातळी वाढविण्यासाठी तयार करणार विशेष ऍक्शन प्लॅन – धनंजय मुंडे

🔶बीड जिल्ह्यातील 57 गावांमध्ये होणार भूजल पातळी वाढविण्यासाठी विशेष काम

बंगळुरू (दि.22) – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज अध्यात्मिक गुरु तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून कृषी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री श्री रविशंकर यांची बंगळूर येथे भेट घेतली. जलयुक्त शिवार 2.0 ही योजना महाराष्ट्रात राबविण्यासाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन व आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या मध्ये करार करण्यात आलेला आहे.

गुरुवर्य श्री श्री रविशंकर यांचे अध्यात्मिक क्षेत्रासह कृषी व सामाजिक क्षेत्रातील योगदान अलौकिक आहे. नैसर्गिक शेतीचा त्यांनी घेतलेला ध्यास व त्यातून उभारलेले कार्य आज संपूर्ण देशात पोचले आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा राज्यात देखील नक्किच फायदा होईल, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. श्री मुंडे यांनी या भेटीत श्री श्री रविशंकर यांना प्रभू वैद्यनाथांची चांदीची प्रतिमा भेट दिली.

राज्यातील 24 जिल्ह्यातील 86 तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार 2.0 योजना राबविण्यात येणार आहे. बीड सारख्या अवर्षण ग्रस्त जिल्ह्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी याअंतर्गत विशेष प्रयत्न केले जावेत, यादृष्टीने आजच्या बैठकीत चर्चा झाली. यासाठी बीड जिल्ह्यातील 57 गावांची निवड करण्यात आली आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार हे अभियान यशस्वी करण्यासाठी एक ऍक्शन प्लॅन तयार केला जावा, असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी सुचवले. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन व जनजागृती करण्याबाबतही स्वतंत्र कार्यपद्धती अवलंबण्यात यावी, याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

राज्य सरकारच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, स्व.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेची एकत्रित बैठक घेऊन समृद्ध शेतीसाठी आणखी काही निर्णय आगामी काळात घेण्यात येतील, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. याप्रसंगी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, पुणे येथील उद्योजक राज घनवट, नितीन कुलकर्णी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रसन्न प्रभू, परळी वैद्यनाथ येथील राजेंद्र सामत, जगदीश मिटकरी, मुकेश भुतडा, अनुप भन्साळी यांसह आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील अनेक सेवेकरी उपस्थित होते, त्या सर्वांची धनंजय मुंडे यांनी व्यक्तिशः भेटून विचारपूस केली.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या