महामार्ग क्रमांक 48 वर वाहतूक कोंडी
पालघर : प्रतिनिधी
दिनांक २७-०२-२०२४ रोजी महामार्ग क्रमांक 48 वर वाहतूक कोंडी झाली आहे. कारण हा हायवे सन 2000 साली मोठा करण्यात आला होता. आता खड्डे पडले आहेत व सारखे खड्डे पडतात या कारणांमुळे हा महामार्ग सिमेंटचा बनवण्यास सुरुवात केली आहे. एकच मार्ग चालू असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे,रोज ये-जा करणे फार त्रासदायक आहे. इतकेच नाही तर ह्या कारणाने अपघात प्रमाण वाढले आहे.आसपास असणाऱ्या गावांना ही याचा खूप त्रास होतो.
तरी महामार्ग प्राधिकरणाने लवकरात लवकर काम करावे अशी मागणी वाहन चालक:मालक यांनी केली आहे,