मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा
परळी /प्रतिनिधी
येथील परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांच्या वाढदिवसानिमित्त अधिकारी ,कर्मचारी कंत्राटदार यांनी जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यातआल्या. यावेळी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष अंगद हाडबे , जयंतीभाई पटेल, शेखर स्वामी, नंदकिशोर जोशी,शिवाजी बिडगर,केशव नागरगोजे , भगवान काकडे, बंडू गीते, दशरथ जाधव , मधुकर नाईकवाडे ,संतोष कांदे, महदेव इटके,भगवान साकसमुद्रे सह दिसत आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्व,कर्तव्यदक्ष अधिकारी, मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांच्या दि ६ मार्च रोजी वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी उपमुख्य अभियंता अमित बनकर, अधीक्षक अभियंता प्रसन्नकुमार गरुड, एस एन बुकतारे,धनंजय कोकाटे, वरिष्ठ महाव्यवस्थापक अरविंद येरणे, वैजनाथ कराड,व्यवस्थापक एस. बी. डोंगरे, सुनील पवार, स्थापत्य विभागाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता एस ए संनाके, सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड, मानव संसाधन विभागाचे विलास ताटे,महादेव वंजारे, विकास कुलकर्णी , बालाजी कांदे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एच गित्ते मॅडम यांनी केले.