🔶खेळाडूंनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० कडे संधी म्हणुन पहावे… प्राचार्य डॉ जॉर्ज अब्राहम.
🔶सिरसाळा (अतुल बडे)
🔶येथील श्री पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, भारतीय शारीरिक शिक्षण संस्था नवी दिल्ली (PEFI) आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०: शारीरिक शिक्षण व खेळतील आव्हाने आणि संधी” या विषयावर राष्ट्रिय परिषदेचे आयोजन दि. १३ मार्च २०२४ बुधवार रोजी करण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणुन मा. श्री. व्यंकटराव कदम साहेब (अध्यक्ष, रा शि प्र मंडळ, सोनपेठ), संस्था सचिव मा, श्री. योगेश भैय्या कदम, उदघाटक म्हणुन डॉ. सुधीर कुमार शर्मा, स्वर्णीम गुजरात स्पोर्टस विद्यापीठ, तर बीजभाषक म्हणुन प्राचार्य डॉ. जी अब्राहम, प्राचार्य, वाय एम सी ए शा. श. कॉ. चेन्नई, मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ सिंकु कुमार सिंग, संचालक, एस आर टी एम यू नांदेड, डॉ संदीप जगताप, क्रिडा संचालक, डॉ बा. अं. म. वि. छ. संभाजीनगर, डॉ पी एल कराड, डॉ उदय डोंगरे, डॉ भीमा केंगले व डॉ अंबादास फटांगरे हे उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ सुधीर शर्मा सरांनी राष्ट्रिय शैक्षणिक धोरण २०२० ची बदलत्या परिस्थितीनुसार गरज, महत्त्व व व्याप्ती यावर सखोल मार्गदर्शन केले.
बिजभाषक प्राचार्य डॉ जॉर्ज अब्राहम यांनी शारीरिक शिक्षण व क्रीडा स्पर्धा यांचे व्यक्तीच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी शारिरीक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि नेतृत्व गुण विकसित कशा पद्धतीने महत्त्वाचे आहेत आणि नवीन शैक्षणीक धोरणातून कशा पद्धतीने खेळाडू व शारीरिक शिक्षनातील क्रीडा कौशल्य विकासात मदत होईल यावर सखोल मार्गदर्शन केले.
या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ सिंकूकुमार सिंह यांनी राष्ट्रिय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अडचणी, समस्या, आव्हाने आणि उपब्ध होणाऱ्या संधी यावर प्रकाश टाकला.
डॉ संदीप जगताप व डॉ पी एल कराड सर यांनी खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा व संधी यावर प्रकाश टाकला.
या राष्ट्रिय परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलताना डॉ उदय डोंगरे यांनी ऑलांपिक क्रिडा स्पर्धा तयारीसाठी राज्य व भारत सरकारच्या विविध योजना आणि भारतीय शारीरिक शिक्षण आणि खेळ विकासासाठी होणारे प्रयत्न या राष्ट्रिय शैक्षणिक धोरण यशस्वी अंमलबजावणीतुन साध्य होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
या राष्ट्रीय चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप अध्यक्षाच्या वतीने प्राचार्य डॉ के के पाटील यांनी केला.
या राष्ट्रिय चर्चासत्रासाठी संपूर्ण देशातून 100 हून अधिक प्राध्यापक, संशोधक आणि अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते.
या चर्चासत्राचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संयोजक तथा शा. शिक्षण विभाग प्रमुख डॉ विठ्ठल रा. भोसले यांनी चर्चासत्र आयोजना मागिल उद्देश स्पष्ट केला.
या राष्ट्रीय चर्चासत्राचे सुत्र संचालन प्रा. विक्रम धन्वे, प्रो डॉ ए व्ही कासांडे, प्रा. दयानंद झिंजुर्डे व डॉ ए व्हीं जाधव यांनी तर आभार डॉ नागरगोजे आणि क्रीडा संचालक डॉ आत्माराम टेकाळे यांनी मानले.
हे चर्चासत्र यशस्वी पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी प्रयत्न केले.