🔶समाजाचा स्वाभिमान दुखावणाऱ्या कोणालाही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही :सुवर्णा कराड,
प्रदेशाध्यक्ष, वंजारी महासंघ
📝मा. मुख्यमंत्री महोदय,
महाराष्ट्र राज्य..
📝प्रिय महोदय,
वंजारी समाज सुसंस्कृत असून इतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेऊन नेहमीच पुढे जात आहे. वंजारी समाज सर्वधर्म समभाव राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. मात्र वाईट हेतूने वंजारी समाजाचा स्वाभिमान दुखावणाऱ्या कोणालाही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. सध्या लोकसभा निवडणुक उंबरठ्यावर आहे. त्यानुसार काही विघातक शक्ती मतांसाठी निवडणुकीत जातीय रंग निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अंधाराचा फायदा घेत जालना जिल्ह्यातील पोखरी येथे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा बॅनर फडकावण्याचा प्रयत्न झाला आहे, तो निंदनीय आहे. वंजारी महासंघ, महिला आघाडी या घटनेचा निषेध करत आहे. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला शोधून तत्काळ कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
🔶सुवर्णा कराड,
🔶प्रदेशाध्यक्ष, वंजारी महासंघ
🔶महिला आघाडी, महाराष्ट्र आणि..