19.7 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

बीड लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे – उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर

बीड लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे – उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर

🔶मतदान केंद्रावर वेब कॅमेरे ठेवणार नजर

परळी (प्रतिनिधी):

39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी व विविध पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवहान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा परळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी केले .ते निवडणूकी संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50 टक्के मतदान केंद्रावर प्रथमच वेब कॅमेरे बसविण्यात आले असून 13 मे रोजी होणाऱ्या मतदानावर करडी नजर ठेवली जाणार आहे.

यावेळी त्यांनी 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 233 परळी विधानसभा मतदारसंघातील तयारीचा माहिती दिली. परळी विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत 323273 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत .यामध्ये एक लाख 69 हजार 244 पुरुष तर एक लाख 53 हजार 530 महिला आणि 3 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी परळी विधानसभा मतदारसंघात एकूण 342 मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत .परळी तालुक्यात 165 परळी शहरात 82 तर अंबाजोगाई तालुक्यात 100 मतदान केंद्रांचा समावेश आहे .निवडणूक लक्ष ठेवण्यासाठी 29 विविध पथके तैनात करण्यात आले आहेत .1470 अपंग मतदार तर 85 वर्षांपुढील मतदारांची संख्या 5993 आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावे यासाठी 36 क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे नेमणूक करण्यात आल्याचेही लाटकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर ,निवडणूक विभाग तहसील कार्यालय नायब तहसीलदार अण्णासाहेब वंजारे, मुसळे आदि उपस्थित होते.

🔶पत्रकारांचे सहकार्य महत्वाचे

नुकत्याच होऊ घातलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचे सहकार्य महत्त्वाचं आहे. बीड जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये पत्रकारांचे सहकार्य महत्वाचे आहे. वर्तमानपत्रांनीही आदर्श आचारसंहितेचे पालन करून निवडणुकीत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी यावेळी केले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या