केज विधानसभा संपर्क प्रमुख परशूराम जाधव यांचा 20 ,21,22 मार्च रोजी दौरा
अंबाजोगाई व केज तालुक्यात शिवसैनिकांनी दौ-याला उपस्थित रहावे : बालासाहेब शेप, अशोक जाधव
बीड : प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना विभागीय नेते आ.सुनिलजी प्रभु साहेब उपनेत्या सुषमाताई अंधारे मराठवाडा समन्वयक मा.विश्वनाथ नेरूरकर साहेब बीड जिल्हा संपर्कप्रमुख मा.किशोरजी पोतदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार सुनील दादा धांडे सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 20 मार्च ते 22 मार्च केज विधानसभा संपर्क प्रमुख परशुराम जाधव केज विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचा कामावा आढावा तसेच शाखाप्रमुख गटप्रमुख बुथ प्रमुख यांच्यासोबत चर्चा करून कामाचा आढावा घेणार आहेत तरी अंबाजोगाई व केज तालुक्यात शिवसैनिकांनी दौऱ्याला उपस्थित रहावे असे आवाहन केज तालुका प्रमुख अशोक जाधव व अंबाजोगाई तालुका प्रमुख बालासाहेब शेप यांनी केले आहे.