अष्टविनायक गणपती मंदिरास पर्यटक विकास निधीतून 1 कोटी 16 लक्ष निधी मंजूर
परळी : प्रतिनिधी
अष्टविनायक गणपती मंदिर ट्रस्ट गणेशगड कन्हेरवाडीला पर्यटक विकास निधीतून 1 कोटी 16 लक्ष निधी मिळवून दिल्याबद्दल ट्रस्ट च्या वतीने आदरणीय सौ.दिपाताई मुधोळ मुंडे (जिल्हा अधिकारी बीड) यांचा सत्कार संपन्न. मौजे कन्हेरवाडी येथील प्रसिद्ध अष्टविनायक गणपती नवसाला पावनारा म्हणून प्रसिद्ध आहे,प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अन्नदान असते.या मंदिर साठी व गावाला सभागृहाची अत्यंत गरज होती हि लक्षात घेता आपल्या आदरणीय वहिनी सौ.दिपाताई मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने सर्व बाबीची पूर्तता करून जिल्ह्य़ाचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे व सौ.दिपाताई मुधोळ मुंडे यांनी मंदिर साठी भरीव निधी मंजूर केल्या बद्दल कृतज्ञता म्हणून सौ.दिपाताई मुधोळ मुंडे, विश्वास मुंडे (आयकर आयुक्त) या दांपत्याचा ट्रस्ट च्या वतीने बीड जिल्ह्य़ात जिल्हा अधिकारी निवासस्थानी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उत्तम दर्जाचे काम व्हावे व याचा फायदा गावाला व्हावा यापुढे ही विकासात्मक कामे करण्याचा मानस त्यांनी बोलुन दाखवला,याप्रसंगी ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री.सुर्यकांत मुंडे,सचिव प्रा.सुनिल फड कोषाध्यक्ष श्री.बंडु उर्फ एकनाथ मुंडे,सदस्य श्री.अरूण फड यांनी सत्कार केला, ट्रस्ट च्या वतीने लवकरच ना.श्री.धनंजयजी मुंडे (कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य)यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.