मनोज जरांगे पाटील यांच्या महासंवाद बैठकीला अखेर न्यायालयाची सशर्त परवानगी
परळी : ब्रेकिंग न्यूज
परळी येथे बुधवारी होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या महासंवाद बैठकीला अखेर न्यायालयाने दिली सशर्त परवानगी.
आज म्हणजेच बुधवार, २० मार्च रोजी परळी वैजनाथ येथे महासंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या बैठकीला पोलीस प्रशासनाने आज सोमवारपर्यंत परवानगी नाकारत आयोजकांना पोलिसांनी कलम 149 सीआरपीसीप्रमाणे नोटीसही बजावली होती. मात्र, आयोजकांकडून ही बैठक होणार असल्याचे सांगितले आहे.
आज सायंकाळी 6 वाजता मोंढा मैदानात ही संवाद बैठक होणार असून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जरांगे पाटील आता नेमके काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
या सभेसाठी आयोजकांनी 13 मार्च रोजी पोलीस प्रशासनाला अर्ज केला होता. मात्र जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचा दाखला देत प्रशासनाने परवानगी नाकारली होती. यामुळे आयोजकांनी थेट छत्रपती संभाजी नगर न्यायालयात याचिका दाखल करत या सभेसाठी परवानगी मागितली. न्यायालयाने या महासंवाद बैठकीला सशर्त परवानगी दिली आहे. सोनपेठ गंगाखेड येथील आजच्या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील समुदाय परळीत जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेला जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे.