भोळी होळी ..
वर्गणीपुस्तक हातात
दारात गुंडांची टोळी
धडकी भरली उरात
आली परत होळी
झाडे आमची तोडली
सुंदर गोंडस कोवळी
पर्यावरण ऐशी तैशी
भाजा आपली पोळी
चला रे आली होळी
तोंडात भांगेची गोळी
फसेल सहजा सहजी
जनता बाभडी भोळी
अंध श्रद्धा मनी दाटे
फाल्गुनपूर्णिमा काळी
सणाचा बेरंग करतो
काळजा जोरा जाळी
बदलावी प्रथा कथा
होळी करावी निराळी
जाणा संस्कृती अर्थ
आनंदा येई झळाळी
काटक्या कुडा जाळी
सांकेतिक करा होळी
अभद्रवर्तन नको मुळी
गरीबां द्या परण पोळी