20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

डोईठाण जवळील शिवनेरी चौकात आपघात

डोईठाण जवळील शिवनेरी चौकात आपघात

टँकरने दुचाकीला चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

आष्टी ( प्रतिनिधी) बीड हून नगरकडे जाणाऱ्या डीझेल टँकर आणि दुचाकीच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना बीड नगर महामार्गावर आष्टी तालुक्यातील डोईठाण जवळील शिवनेरी चौकात घडली.

याठिकाणी तीन रस्ते एकत्र येत असल्याने हे ठिकाण अपघाताचे बनले आहे. पाटोदा तालुक्यातील सकुंडवाडी येथील महादेव गायकवाड हे कडा येथून काम आवरून धामणगाव मार्गे गावाकडे जात असताना धामणगाव येथे डोईठाण येथील अनिल विठ्ठल तरटे वय 19 या युवकाने लिफ्ट मागितली.गायकवाड याने लिफ्ट दिली, दोघेही दुचाकीवरून जात असताना सायंकाळी चारच्या दरम्यान जात असताना बीड येथे डिझेल खाली करून अहमदनगरच्या दिशेने जात असलेला टँकर क्रमांक एम एच सोळा सी सी 76 31 याची जोरात धडक दुचाकीला बसल्याने झालेल्या अपघातात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
धडकून पळून जात असलेल्या या टँकर चालकाला कडा चौकीच्या पोलिसांनी टँकर चालकाला टँकर सह ताब्यात घेतले आहे. अपघाताचे वृत्त समजताच नागरिकांनी धाव घेत मदतीसाठी प्रयत्न केले.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या