24.4 C
New York
Wednesday, May 29, 2024

Buy now

spot_img

आज पर्यंत आपल्या समाजाचा कितपत उद्धार झाला याच आत्मचिंतन करूनच मायक्रो ओबीसी घटकाने निवडणुकीत मतदान करावे—- जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांचे मत

आज पर्यंत आपल्या समाजाचा कितपत उद्धार झाला याच आत्मचिंतन करूनच मायक्रो ओबीसी घटकाने निवडणुकीत मतदान करावे—-

जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांचे मत

आज पर्यंत आपल्या समाजाचा कितपत उद्धार झाला याच आत्मचिंतन करूनच मायक्रो ओबीसी घटकाने निवडणुकीत मतदान करावे—-

जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांचे मत

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

ओ बी सी प्रवर्गातील बोटावर मोजता येतील एवढ्या पोट जाती मधील लोकच सत्ते सह नौकऱ्या मध्येही लाभ घेत असल्याने मायक्रो ओबीसी घटकाने आज पर्यंत आपल्या समाजाचा कितपत उद्धार झाला याच आत्मचिंतन करूनच या निवडणुकी मध्ये मतदान करण्याची आवश्यकता असल्याचे मत गुरव समाजाचे कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांनी व्यक्त केले आहे.
देशभरा सह महाराष्ट्रा मध्ये ही लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकी पूर्वी राज्यभरात जे मराठा आरक्षणाचे वादळ पेटल्या गेले, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसींच्या कोट्या मधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची आग्रही भूमिका कायम ठेवली. घटनेच्या दृष्टीने ओबीसी कोट्या मधून हे आरक्षण मिळू शकत नाही आणि राज्य सरकार आरक्षणाचा तिढा सोडवू शकत नाही हे आंदोलन कर्त्या मराठा समाजातील जाणकार मंडळीलाही माहीत आहे आणि या आंदोलनाला विरोध करणाऱ्या ओबीसी समाजातील जाणकार मंडळीलाही माहीत आहे.
या आंदोलनातुन एक निष्पन्न झालं आहे मराठा बांधव त्यांच्या हक्कासाठी लढाई लढत आहेत,

 

या आंदोलनातुन मनोज जरांगे यांच्या रूपाने जे नेतृत्व उदयास आले त्या जरांगे पाटील यांची भुमीका समाजासाठी म्हणुन आज तरी निस्वार्थी राहिलेली असल्याने राज्य भरातून मराठा समाज मोठ्या ताकतीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला असुन जरांगे पाटील यांचा आदेश म्हणजे “सर आखों पर” असल्याने आज राज्यभरातील सर्वच पक्षातील मराठा समाजातील जे लाभार्थी नेते आहेत त्यांच्या पाठीशी समाज जायला तयार नाही.

या उलट ओबीसी आरक्षण वाचावे या साठी छगन भुजबळ हे एकमेव मंत्री रस्त्यावर उतरले, राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव मेळावे झाले त्या त्या ठिकाणी छगन भुजबळ व्यतिरिक्त राज्यातील एकही मंत्री अथवा विरोधी पक्षातील नेता भुजबळ यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षण बचावच्या लढ्यात रस्त्यावर ऊतरलेला नाही ही बाब बीड जिल्ह्यासह राज्य भरातील ओबीसी प्रवर्गाला माहीत आहे.

ओबीसी आरक्षण बचावासाठी छगन भुजबळ एकाकी लढले या बद्दल त्यांचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे मात्र या ओबीसीच्या लढ्याला मराठा आंदोलका प्रमाणे जो प्रतिसाद मिळायला हवा होता तो मिळालेला दिसला नाही आणि याला कारणही तसंच घडलं आहे आणि हे वास्तव ओबीसी नेत्यांनाही मान्य करावेच लागणार आहे. आज राज्यात ओबीसी प्रवर्गात 346 पोट जाती आहेत आणि

2 ते 3 ओबीसी मधील पोट जातीचे लोकच सत्तेचा पुरेपूर लाभ घेत आहेत.
याच 2 ते 3 पोट जाती मधील लोक सत्तेत आहेत, नौकरी मध्येहि तेच लाभ घेत आहेत, गुत्तेदारी क्षेत्रात ही याच 2 ते 3 पोट जातीचा वर चष्मा आहे. मात्र याच ओबीसी प्रवर्गातील साळी, कोळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, विणकर, कुंभार, सोनार, लोहार, शिंपी, बंजारा या सारख्या ज्या मायक्रो ओबीसी जाती आहेत त्यांचा कुणीही तारणहार नसल्याने ना सत्तेचा लाभ मिळाला आहे, ना नौकरी वर्गात आपले स्थान निर्माण करता आले आहे की गुत्तेदारी क्षेत्रात कुठे लाभ मिळालेला नाही. हुकून चुकून मायक्रो ओबीसी घटकातील एखादा नेता सत्तेत गेला असेल, राजकारणात असेल तर तो आपल्या गोरगरीब बांधवासाठी मागे वळून पाहण्यास तयार नाही. हा सर्व प्रकार मायक्रो ओबीसी समाज डोळ्याने पाहतो आहे, दिवसेंदिवस अनुभवतो आहे आणि याच कारणास्तव मायक्रो ओबीसी समाजातील लोकांनी छगन भुजबळ यांच्या ओबीसी बचाव लढ्यात कुठेही आपला सहभाग नोंदवलेला दिसून आलेला नाही.
एकूणच राज्य भरातील चित्र पाहिले तर मायक्रो ओबीसी समाजाचे दुःख ना सत्ताधारी समजून घेत आहेत ना विरोधक समजून घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि सर्वच उमेदवारांना मतांच्या लाचारी पोटी स्वतःचा स्वार्थ डोळ्या समोर ठेऊन मायक्रो ओबीसीचा पुळका येणार आहे.

मायक्रो ओबीसी समजाला विविध प्रकारचे आमिषे दाखवल्या जातील, दाबदडप होईल, त्यामुळेच आशा परिस्थिती मध्ये मायक्रो ओबीसी घटकाने आज पर्यंत आपल्या समाजाचा कितपत उद्धार झाला याच आत्मचिंतन करूनच या निवडणुकी मध्ये योग्य उमेदवारास मतदान करण्याची आवश्यकता असल्याचे मत गुरव समाजाचे कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांनी व्यक्त केले आहे

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या