20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

पो.स्टे. संभाजीनगर परळी वैजनाथ पोलीसांची आचार संहितेत दबंग कारवाई

पो.स्टे. संभाजीनगर परळी वैजनाथ पोलीसांची आचार संहितेत दबंग कारवा

पोलीस निरीक्षक उस्मान शेख व टीमच्या कार्यतत्परतेचे होत कौतुक

परळी : प्रतिनिधी

दिनांक 13/04/2024 रोजी पोलीस स्टेशन संभाजीनगर परळी वैजनाथ येथील पोलीस अधिकारी व अंमलदार पो.नि उस्मान शेख,यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि शिंदे, पोह भांगे, पोना/सानप, पोना/ मस्के,पोना/ शिंदे, पोरको/ फड, पोरकॉ/ गुट्टे असे पोलीस ठाणे संभाजीनगर येथे हजर असतांना बातमी मिळाली की, सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी रा फुलेनगर परळी हा उड्डणपुला खाली थांबला असुन त्यांचे जवळ गावठी कट्टा
आहे अशी बातमी मिळाल्याने आम्ही, नमुद पोलीस स्टाफ व दोन पंचासह रवाना होवुन सुरजसिंग प्रेमसिंग जुन्नी रा फुलेनगर परळी हा उड्डाण पुलाखाली शिंदी खाण्याचे समोर मिळून आला पंचा समक्ष त्याची अंग झडती घेतली असता त्याचे कंबरेला उजव्या बाजुस पॅन्टंमध्ये खोवलेला एक सिल्वर रंगाचा स्टेनलेस स्टीलचा गवठी बनावटीचा मॅंगझीनसह कटटा(पिस्टल),ज्यास पकडण्यासाठी स्टीलची मुठ व त्यावर ग्रीप करीता चॉकलेटी रंगाचे प्लास्टीक कव्हर असलेला असा जुना वापरता कि.अ.40.000/- रुपये व मॅंगझीन मध्ये दोन
जिवंत काढतुस 1000/- रुपये असे गावठी कटटा व काढत्स दोन्हीची एकुण किमंत 42,000/- रुपयेचा मुदेमालासह मिळुण आल्याने दोन पंचासह जप्ती पंचनामा करुन मु्देमाल व आरोपी ताब्यात घेवुन त्यावरुन.संभाजीनगर गु.र.न 55/2024 कलम कलम 3/25, भारतीय शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि ए.टी. शिंदे करीत आहेत.सध्या सन उत्सव व लोकसभा निवडणुक 2024 ची अचारसंहिता चालु असल्याने निवडणुक निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार
पडाव्यात म्हणुन सराईत गुन्हेगार व दहशत करणारे ज्ञात व अज्ञातावर बारकाईने लक्ष ठेवुन समाजात दहशत निर्माण होणार नाही. यासाठी वरील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती पोलीसांना देण्या बाबत अहवान करण्यात येत आहे.माहिती देणाच्याचे नाव अती गोपनिय ठेवण्यात येते.सदरची कार्यवाही मा. श्री. नंदकुमार ठाकुर पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके मँडम अपर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, मा. श्री अनिल चोरमले उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या