सुर्य आणि चंद्र असे पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान राहणार – राजेश गिते
सुर्य आणि चंद्र असे पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान राहणार – राजेश गिते
परळी : प्रतिनिधी
महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त
मौजे लोणी,तालुका परळी वैजनाथ
येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन आणि पंचशील ध्वजारोहण करून भीम जयंती साजरी करताना वैधनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ गड पांगरी संचालक तथा भाजपा नेते राजेश गिते, पंचायत समिती सदस्य भरतराव सोनवणे, मांडवा मा सरपंच सुंदर मुंडे, नंदनंज मा सरपंच अनिल गुट्टे,मिरवट मा सरपंच धुराजी साबळे, लोणी मा सरपंच प्रल्हाद शिंदे आदी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना भाजपा नेते राजेश गिते यांनी सांगितले की जोपर्यंत सुर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान राहणार आणि देश सुध्दा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान वर चालणार.आज संविधान मुळेच आठरा पगड जातीतील निराधार वंचित यांना न्याय मिळत आहे असे प्रतिपादन राजेश गिते यांनी केले.या जयंतीनिमित्त लोणी गावातील लहान मुलांनी व्यक्त केलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चे विचार ऐकून आपण मनापासून आनंदी झालो आणि इतर गावांतील भीम जयंती उत्सव समितीने लोणी गावातील भीम जयंती चा आदर्श घेवून जयंती साजरी करावी असे आवाहन राजेश गिते यांनी केले.
भीमजयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.