अकोला : वृत्तसंस्था
दि.16 बीड लोकसभा वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांची मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी अकोला येथील यशवंत निवासस्थानी भेट घेऊन आशिर्वाद घेतले.
अँड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघा बाबत याप्रसंगी चर्चा केली. त्यावेळी अँड.प्रकाश आंबेडकर यांनी मराठवाड्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवाराचे ऐ.बी.फॉर्म अशोक हिंगे पाटील यांच्याकडे सुपर्द केले. यावेळी अशोक हिंगे यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अँड.प्रकाश आंबेडकर यांनी यावे असा आग्रह धरला त्यावर त्यांनी येण्याचे मान्य केले आहे. यावेळी त्यांच्या सोबत बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे,ज्ञानेश्वर कवठेकर, बालाजी जगतकर,अजय सरवदे पदाधिकारी उपस्थित होते.