RTE ऑनलाईन प्रक्रिया सुरु जाणून घ्या नियम, आणि फायदे
जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरिता या योजनेचा लाभ घ्यावा.
२०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियअंतर्गत दिनांक १६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी / फॉर्म भरण्यासाठी:
https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login
या वेबसाईट वरील आर.टी.ई पोर्टलला भेट द्या
लागणारी आवश्यक कागदपत्रे
1)पालकांचे आधार कार्ड
2)मुलांचे जन्म दाखला
3)जातीचा दाखला
4) उत्पन्न दाखला (वंचित जात संवर्गाला उत्पनाची आवश्यकता नाही)
5) रहिवासी पुरावा:-आधार कार्ड रेशनकार्ड,लाईट बील मतदान कार्ड,बॅंकेचे पासबुक ,गॅस पासबुक
6) वरीलपैकी रहिवासी पुरावा नसेल तर भाडेकरारनामा
ही माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचवा