4.9 C
New York
Sunday, January 19, 2025

Buy now

तर कारवाई होणार; फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचा कार्यकर्त्यांना नवा आदेश

तर कारवाई होणार; फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचा कार्यकर्त्यांना नवा आदेश

मुंबई: वृत्तसंस्था : राज्यात सत्तेमध्ये तिसरा भिडू सहभागी झाला आहे. त्याचवेळी विधानसभेचे पावसाळी अधिवेशनही सुरू झालंय. अशात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस येऊ घातला आहे. येत्या 22 जुलैला फडणवीस यांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांची सेलिब्रेशनसाठी तयारी सुरू होती. मात्र, त्याचवेळी पक्षाकडून महत्त्वाचा आदेशवजा इशारा आला आहे.
पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी कळविले आहे. होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी विविध सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी दिली.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या