राष्ट्रीय महामार्ग करतावेळी मोठ मोठ्या झाडांची केली कत्तल ; मुख्याधिकारी रवि कुमार साहेब असंख्य रोपटे केव्हां लावताय ?
केज / अजय भांगे
केज शहरामधुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग त्या महामार्गाचे तब्बल तीन वर्षापासुन काम एच.पी.एम कपंनीच्या माध्यमातुन अतिशय संत गतीने होत आहे आहे. त्यामध्येही त्या त्या स्थानिक ठिकाणी असंख्य गुत्तेदारामार्फत कामे करुन घेतली त्यामुळेच सदरील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली असल्याचे दिसुन येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने कामामध्ये स्टीलचा वापर न केल्यामुळे जागोजागी राष्ट्रीय महामार्गाला गेलेले तडे, भेगा , चिरा तसेच रस्ता जागोजागी खचने हे यावरून स्पष्ट होते आहे. त्यामध्ये भर म्हणुन कि काय मुख्याधिकारी रवि कुमार यांच्या आर्शीवादाने परत राष्ट्रीय माहमार्गा लगत असणार्या गावानंकडे जाणार्या रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे. सदरील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची गुणवत्ता तपासणे हे मुख्याधिकारी रवि कुमार यांचे काम होते परंतु त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे संपूर्ण रस्त्याची वाट लागली आहे .
त्याबरोबरच राष्ट्रीय महामार्ग बनवण्यापूर्वी याच रस्त्यावर मोठ-मोठी वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती त्या झाडांची कत्तल करून परत राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर रस्त्याच्या बाजुने कांही अंतरावर झाडे लावणे बंधनकारक असताना. आज पर्यंत एकही झाड लावलेले आढळुन न आल्यामुळे मुख्याधिकारी रवि कुमार साहेब आपण झाडे तोडली खरी परंतु परत लावणार कि नाही ? रस्त्याची गुणवत्ता तपासणार कि नाही ? आदि प्रश्न नागरीकांना पडले आहेत