मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील २३ जुलै रोजी जिल्ह्यात
वाशिम I दि.२२:(अजय ढवळे ) मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे २३ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवारी २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता यवतमाळ येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण करतील. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आगमन व वाकाटक सभागृहात आयोजित नैसर्गिक आपत्तीविषयक आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी १ ते २ वाजतापर्यंत राखीव.दुपारी २ वाजता मेहकर,चिखलीमार्गे बुलढाणाकडे प्रयाण करतील.