20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून लोखंडीच्या वृद्धत्व व स्त्री रुग्णालयांचा आढावा.

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून लोखंडीच्या वृद्धत्व व स्त्री रुग्णालयांचा आढावा.

डॉक्टर सुरेश साबळे यांच्या आरोग्य सेवेच्या बाबतीत लोखंडी सावरगाव परिसरातील तसेच लोखंडी सावरगाव रुग्णालयातील सर्व रुग्णांमधून डॉक्टर साबळे करत असलेल्या आरोग्य सेवेच्या बाबतीत समाधान व्यक्त केले..

बीड, दि. २३ (प्रतिनिधी) :

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी शनिवारी (दि. २२) लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक उपचार कें्रद तसेच स्त्री रुग्णालयांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी डॉ. साबळे यांनी दोन्ही रुग्णालयांच्या अंतररुग्ण विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून उपचाराबाबत विचारपूस केली.
वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रात अस्थिरोगाच्या विविध शत्रकिया तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया व उपचार लवकरच सुरू करण्यासाठी व रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा देण्याच्या सुचना संबंधीत अधिकाऱ्यांनाकेल्या. स्त्री रूग्णालयात संस्थात्मक प्रसुती वाढवण्याबाबतही डॉ. साबळे यांनी सुचना दिल्या. या ठिकाणी नव्याने बाह्य स्त्रोत यंत्रणेद्वारे रिक्त ७९ विविध पदे भरली असुन या ठिकाणी नव्याने नेमणूक केलेल्या वार्ड बॉय यांनी साफसफाईचे काम नियमित करावे, अन्यथा काम न करणाऱ्यांच्या सेवा थांबविल्या जातील, असा इशाराहीदिला. टेली मानस या मानसिक आरोग्य कार्यक्रमातील सर्व कर्मचारी यांना कॉलची संख्या वाढवण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आदेश डॉ. सुरेश साबळे यांनी दिले.
अंबाजोगाई तालुक्यातील ्रगामीण भागातील रुग्णांना लोखंडी सावरगाव येथील मानसिक आरोग्य व वृद्धत्व उपचार कें्रद तसेच स्त्री रुग्णालयात याच ठिकाणी सेवा भेटाव्यात, त्यांना रेफर करु नये, असेही डॉ. साबळे म्हणाले.
सर्व अधिकारी व स्टाफची आढावा बैठक झाली. यावेळी मानसिक आजार कें्रद व वृद्धत्व उपचार केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. राम आव्हाड आदींची उपस्थिती होती.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या