नाशिक : माधव नेहे
नाशिकच्या राजगड कार्यालयात अमित ठाकरे यांच्या हस्ते दिलीप दातीर यांचा टोलनाका फोडल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत दिलीप दातीर यांनी केकही कापला. या केकवर समृद्धी टोल नाका आंदोलन असे लिहीले होते. यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, काहीही मुद्दामहून घडवून आणले नाही. अनाकलनीय घडलं. प्रेमापोटी मी भेटायला आलो. त्यांचे अभिनंदन करायला आलो. टोलबद्दल मेसेज द्यायला पाहिजे.
बाऊन्सर टोलवर ठेऊन दादागिरी होतं आहे. याचा सामान्य लोकांना किती त्रास होत असेल? टोलच्या बाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ठाणे, वाशी टोलनाक्यावर 1 तास थांबावे लागतं. 8 ते 10 टॅक्स वेगळे भरावे लागतात.
तर, टोलनाका फोडल्याने भाजपने अमित ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते. यावरही अमित ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या टिकेला मी भीक घालत नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले आहे. तसेच, एकदा राज साहेब यांच्यावर विश्वास ठेवा, संधी द्या. पुढच्या वर्षी एकदा बघा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नाशिकच्या राजगड कार्यालयात अमित ठाकरे यांच्या हस्ते दिलीप दातीर यांचा टोलनाका फोडल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
https://atulyamaharashtra.com/