ग्रामीण नायकाला प्रतिष्ठा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ खरे साहित्य सूर्य-प्रदिप मुंडे*
*साठेनगर येथील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त केले अभिवादन!*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- ज्यावेळी गावकुसाबाहेर शिक्षणाचा गंध नव्हता. अशावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीद्वारे ग्रामीण नायकाला प्रतिष्ठा मिळवून दिली. ते खरे साहित्य सूर्य आहेत. असे प्रतिपादन नागापूर गटाचे जि.प.सदस्य प्रदिप (बबलूसेठ) मुंडे यांनी केले.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बस स्टँड रोडवरील चौकात १०३ वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात व उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम आण्णाभाऊ साठे व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले साहित्य अर्पण करुन जग बदलुनी केला घाव, सांगून गेले आम्हा भिमराव असे कवण केले. बौध्द व मातंग समाज एकत्र ठेवण्याचे काम यानिमित्त झाले आहे. असेही प्रदिप (बबलु) मुंडे यांनी स्पष्ट केले. सामाजिक सलोख्याचे एक सुंदर उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केले.
यावेळी विनायक मस्के,सचिन कांबळे, विठ्ठल लोंढे, महादू मस्के, निवास मस्के,संतोष मस्के,मुन्ना मस्के,गणेश मस्के,बालाजी मस्के,गुलाब क्षीरसागर आदी उपस्थित होते.