4.4 C
New York
Saturday, December 7, 2024

Buy now

पुरूषोत्तम मासानिमित्त परळी महात्म्य कथा, किर्तन महोत्सवात आज ह.भ.प.युवा किर्तनकार प्रकाश महाराज फड यांचे किर्तन

पुरूषोत्तम मासानिमित्त परळी महात्म्य कथा, किर्तन महोत्सवात आज ह.भ.प.युवा किर्तनकार प्रकाश महाराज फड यांचे किर्तन

परळी वैजनाथ आई – वडीलांच्या स्मरणार्थ आणि पुरूषोत्तम मासानिमित्त भास्कर मामा चाटे परिवाराच्या वतीने परळी महात्म्य कथा, संत तुकाराम गाथा पारायण व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भास्कर मामा चाटे यांनी केले आहे. बुधवार दि. 2 ते 10 ऑगस्ट दरम्यान मुक्ताई लॉन्स शिवाजी नगर, येथे हा कार्यक्रम होणार आहे. आज दि.3 रोजी युवा किर्तनकार प्रकाश महाराज फड यांचे किर्तन सायं.6 ते 8 या वेळेत संपन्न होणार आहे.
यात कथा प्रवक्ते ह. भ. प. भरत महाराज जोगी असुन गाथा पारायण प्रमुख ह. भ. प. माऊली महाराज रूमणेकर आहेत. दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान परळी महात्म्य कथा होणार आहे तर 7 ते 11 गाथा पारायण तर रात्री 6 ते 8 या वेळेत हरि कीर्तन होणार आहे. दरम्यान दि. 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या दरम्यान रोज रात्री 6 ते 8 या वेळेत अनुक्रमे ह. भ. प. भागवताचार्य मंगेश महाराज डाबीकर यांची किर्तन सेवा संपन्न झाली. ह. भ. प. प्रकाश महाराज फड आळंदीकर, ह. भ. प. रामायणाचार्य अमोल महाराज गुट्टे नंदनजकर, ह. भ. प. भागवताचार्य बाळू महाराज लटपटे, ह. भ. प. जनाई महाराज कोकाटे, ह. भ. प. भागवताचार्य जगदीश महाराज सोनवणे, ह. भ. प. श्याम महाराज नेहरकर यांची किर्तने होणार आहेत. दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत विष्णुपंचायतन याग होणार असुन त्याचे पौरोहित्य विजयकुमार उंडेगावकर करणार आहेत तर याच दिवशी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत पं. यादवराज फड यांचा भक्ती स्वरगंध कार्यक्रम होणार आहे. दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ह. भ. प. भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
या सप्ताहाचे संयोजक श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्था टोकवाडीचे जगदीश महाराज सोनवणे आहेत. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे सौ. शोभाताई भास्करराव मामा चाटे, सौ. अर्चना श्रीकांतराव चाटे, सौ. वैशाली शशिकांत चाटे, सौ. डॉ. स्वप्ना रविकांत चाटे यांनी केले आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या