20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती विभागात राष्ट्रीय गणित दिननिमित्त गणित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन संपन्न

संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती विभागात राष्ट्रीय गणित दिननिमित्त गणित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन संपन्न
शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून गणित विषयाची गोडी शिक्षकांनी निर्माण करावी – दिपक तांदळे
 परळी प्रतिनिधी : अमोल सूर्यवंशी
श्री पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती विभाग येथे थोर गणिततज्ज्ञ श्री रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
            या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री कैलासजी तांदळे साहेब, संस्थेचे सचिव श्री दिपकजी तांदळे साहेब, संस्थेच्या सहसचिव तथा शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आदर्श शिक्षिका, परळी भूषण श्रीमती प्रेमीला गित्ते मॅडम, परळीतील अबॅकस विषयातील तज्ञ शिक्षिका श्रीमती पंपालिया मॅडम, सेवानिवृत शिक्षक श्री पाचंगे सर, शाळेचे पर्यवेक्षक श्री इंगळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणिततज्ञ श्री रामानुजन व आदर्श शिक्षक कै. श्री विठ्ठलराव तांदळे सर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संस्कार प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या भव्य दिव्य अश्या गणित साहित्य प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी तयार केलेल्या गणित विषय आधारित शैक्षणिक साहित्याचे कौतुक प्रमुख पाहुण्यांनी केले.
           यावेळी पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपक तांदळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ते म्हणाले की,” अभ्यासक्रमात गणित हा विषय अवघड मानला जातो पण या अवघड वाटणाऱ्या विषयात गोडी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी विशेष असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. यात शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यात गोडी निर्माण करता येऊ शकते. याचाच भाग म्हणून आमच्या शाळेने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित साहित्य प्रदर्शन आयोजित केले आहे. यात विद्यार्थ्यांनी स्वयंनिर्मित केलेली अनेक शैक्षणिक साधने या उपक्रमाचा विशेष भाग आहे. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य प्रदर्शन कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये अवघड वाटणारा असा गणित विषयाची आवड निर्माण करणे हा आहे”.
         यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती पंपालिया मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी त्या म्हणाल्या की “संस्कार प्राथमिक शाळा ही अबॅकस चे मोफत विनामूल्य शिक्षण देणारी महाराष्ट्रातील पहिलीच शाळा आहे. तसेच या प्रकारचे गणित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन आयोजित करणारी पहिलीच शाळा असेल. यावेळी त्यांनी शाळा व शाळा व्यवस्थापनाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या “. तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्री पाचंगे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रावळ मॅडम, प्रास्ताविक श्रीमती पायघन मॅडम, तर आभार श्री खरोळकर सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या