16.2 C
New York
Thursday, May 30, 2024

Buy now

spot_img

वडकी येथे शासन आपल्या दारी व महाआरोग्य शिबिर संपन्न

वडकी येथे शासन आपल्या दारी व महाआरोग्य शिबिर संपन्न

(सर्व घटकांतील नागरिकांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, आमदार डॉ अशोक ऊईके)

चेतन वर्मा जिल्हा प्रतिनिधी:-

राळेगाव तालुक्यातील वडकी येथे २२ डिसेंबर रोजी शासन आपल्या दारी व महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमांची सुरुवात, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन आमदार डॉ अशोक ऊईके यांनी केले, शासन आपल्या दारी महाआरोग्य शिबिर चा लाभ शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ वडकी परिसरात सर्व समाज घटकांतील नागरिकांनी घ्यावा असे आपल्या भाषणातून आमदार डॉ अशोक ऊईके यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी, संजय काकडे, सामाजिक कार्यकर्ते, विजय महाले ठाणेदार इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले
सदर कार्यक्रम मध्ये विविध योजनांच्या लाभार्थींना धनादेश, महीला बचत गटांना धनादेश, लाभार्थ्यांना काही योजनेचे साहित्य आमदार महोदयांच्या हस्ते वाटप करण्यात आले नंतर आमदार महोदयांनी शिबारात आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या ऐकून घेतल्यावर नागरिकांनी दिलेले अर्ज स्विकारले सर्वांच्या समस्या सोडवणार असे आश्वासन दिले.शिबिरामध्ये पी.एम किसान केवायसी, पी. एम किसान नोंदणी, आधार कार्ड अपडेट, आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नवीन शिधापत्रिका, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग , पंचायत विभाग, वनविभाग सेंट्रल बँक विद्युत महावितरण विभाग संजय गांधी निराधार विभाग, अन्न पुरवठा विभाग, निवडणूक विभाग व इतर विभागांचे टेबल टेबल लावले होते प्रत्येक नागरिकांनी जाऊन अर्ज करून आपल्या समस्याचे निराकरण केले. महीला बचत गटांनी आपल्या वस्तूंचे स्टॉल लावले होते .अंगणवाडी कर्मचारी यांनी प्रत्येक पदार्थाचे स्टॉल लावले होते. प्रत्येक स्टॉलवर आमदार महोदयांनी जाऊन पाहणी केली. तसेच महाआरोग्य शिबिरामध्ये मेघे सावंगी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरच्या टीमने शिबिरा मधील रुग्णावर प्रथमोपचार केले . रुग्णाच्या तपासणीसाठी शिबिरामध्ये वेग वेगळ्या बिमारीच्या रुग्णांनची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले व गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना मेघे सावंगी हॉस्पिटल येथे भरती होण्याकरिता सांगितले .
कार्यक्रमांचे संचालन सागर विटाळकर महिला बाल विकास अधिकारी, प्रास्ताविक अमित भोईटे तहसीलदार, आभार प्रदर्शन केशव पवार गटविकास अधिकारी यांनी केले.
यावेळी मंचावर सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी, अमित भोईटे तहसीलदार, चित्तरणदादा कोल्हे भाजप तालुकाध्यक्ष, केशव पवार गटविकास अधिकारी, संजय काकडे सामाजिक कार्यकर्ते, विजय महाले ठाणेदार, मनोज भोयर तालुकाध्यक्ष शिवसेना, शैलेश बेलेकार सरपंच वडकी सर्व विभागांचे अधिकारी, सर्व सरपंच, सर्व पत्रकार बंधु उपस्थित होते तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी, मंडळ अधिकारी सर्व तलाठी ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी महसूल कर्मचारी पोलिस कर्मचारी पंचायत कर्मचारी शिक्षण विभाग कर्मचारी जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत वडकी तसेच सर्व विभागांच्या कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व वडकी परिसरातील सर्व नागरिकांचा शिबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या