19 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

दुचाकी चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

दुचाकी चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

बिटरगाव पोलिसांची कारवाई.

उमरखेड प्रतिनिधी –
गेल्या काही दिवसापासून उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या दुचाकी चोराला पकडण्याचे मोठे आव्हान बिटरगाव पोलिसांपुढे होते. ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी पदभार स्विकारल्यानंतर आपल्या गुप्तहेरना कामी लावत या दुचाकी चोराचा छडा लावण्याचे शिवधनुष्य ठाणेदार यांनी हाती घेतले . त्यांना मिळालेल्या माहिती नुसार ढाणकी शहरातील दुचाकी चोर हे नांदेड जिल्ह्यातील किनवट व भोकरचे असल्याची गोपनीय माहिती मिळाली माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे, पोलीस अंमलदार देविदास हाके, विद्या राठोड, निलेश भालेराव, शरद चव्हाण, राहुल कोकरे यांनी किनवट व भोकर येथून बालाजी अभिमान माने वय 28 वर्ष रा. गोकुंदा किनवट, व विजय तुळशीराम सोनकांबळे वय 34 वर्ष रा दिवशी, भोकर यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील पाच दुचाक्या जप्त करण्यात आल्या.सदर जप्त केलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 253000 रु आहे. या दुचाकी चोरीची फिर्याद अमोल दिगंबर सुरोशे,ज्ञानेश्वर रामभाऊ महाजन, गुलशन खान आलम खान यांनी बिटरगाव बु पोलीस स्टेशन ला दिली होती. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रेम कुमार केदार, उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे, देविदास हाके, विद्या राठोड, निलेश भालेराव, शरद चव्हाण, राहुल कोकरे यांनी केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे करत आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या