20.9 C
New York
Tuesday, October 8, 2024

Buy now

श्री काळभैरव देवस्थान मांडवा यात्रेनिमित्त जंगी वैयक्तिक कुस्त्यांची स्पर्धा संपन्न

श्री काळभैरव देवस्थान मांडवा यात्रेनिमित्त जंगी वैयक्तिक कुस्त्यांची स्पर्धा संपन्न

श्रीकृष्ण दादा चाटे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं

परळी | अमोल सूर्यवंशी

श्री काळभैरव देवस्थान मांडवा परळी वैजनाथ यात्रेनिमित्त भव्य अशा वैयक्तिक कुस्त्यांची स्पर्धा संपन्न श्रीकृष्ण दादा चाटे यांच्या वतीने वैयक्तिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलं होतं काळभैरव देवस्थान यात्रा ही महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या बाहेरही प्रसिद्ध आहे. या यात्रेनिमित्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरूनही अनेक राज्यातून भाविक भक्त मोठ्या उत्साहामध्ये मांडवा या परळी वैजनाथ तालुक्यातील गावांमध्ये येत असतात. याच यात्रेचे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण दादा चाटे यांच्या वतीने वैयक्तिक कुस्त्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुळामध्ये प्रथम पारितोषिक हे 3000 असून सुद्धा त्यांनी पाच हजार रुपयांच पारितोषिक देऊन आपल्या मनाचा मोठेपणा सिद्ध केला. या वैयक्तिक कुस्त्यांच्या स्पर्धेमध्ये परळी आणि पंचक्रोशीतील पैलवानांसोबतच अनेक मातब्बर पैलवानांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमास परळीतील अनेक सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी यांनी हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. जिल्हा परिषद सदस्य प्रा. डॉक्टर मधुकर आघाव सर, भाजपा युवा मोर्चाचे मा.जिल्हाध्यक्ष निळकंठ भाऊ चाटे तसेच भाजपाचे कर्तुत्वान मा. नगरसेवक प्रा. पवन मुंडे त्याचबरोबर अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली.
यावेळी आलेल्या मान्यवरांचा श्रीकृष्ण दादा चाटे तसेच गावातील इतर प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला श्रीकृष्ण दादा चाटे हे पोलीस मित्र संघटना नवी दिल्लीचे बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असून भारत राष्ट्र समितीचेते परळी तालुका समन्वयक (प्रमुख) आहेत. त्यांचं राजकारणा पेक्षाही अधिक सामाजिक असं कार्यात मोठं कार्य आहे .
मांडवा आणि परिसरातील पैलवानांसाठी श्री काळभैरव देवस्थान यात्रेनिमित्त स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून कुस्त्यांच जंगी आयोजन केलं होतं. कुस्त्या पाहण्यासाठी संपूर्ण मांडवेकरांबरोबरच पंचक्रोशीतील अनेक प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, अशाप्रकारे श्रीकृष्ण दादा चाटे यांच्या सद विचारातून काळभैरव देवस्थानाच्या यात्रेनिमित्त जंगी वैयक्तिक कुस्त्यांची स्पर्धा संपन्न झाली

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या