शिवछत्रपती विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
परळी वैजनाथ. —–येथील शहरातील शिवाजी नगर भागातील टी पी एस रोड कडील शिवछत्रपती विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिकादिन म्हणून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक संजय समुद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील सहशिक्षिका सौ.सुहासिनी घोबाळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंवर भाषणे केली.
शाळेतील सहशिक्षक सिद्धेश्वर इंगोले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.आपले विचार व्यक्त करताना सौ.घोबाळे म्हणाल्या कि,” सावित्रीबाईंनी मुलींच्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार केला आहे.अनिष्ट प्रथांना विरोध करून स्त्रियांचा उद्धार केला.त्यामुळे मुलींना सावित्रीबाईंचा आदर्श घ्यावा.” अध्यक्षीय समारोपात मु.अ.संजय समुद्रे यांनी बालिकादिनाचे महत्व सांगितले.आज मुली कुठेच कमी नाहीत प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत.आणखी त्यानी पुढे जावे असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन अशोक फड यानी केले.सिद्धेश्वर इंगोले यांनी उपस्थितांचे आभार मानले .कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते…